पोस्ट्स

मार्च २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत जपान मैत्रीचा नवा सेतू

इमेज
              जपान , उगवत्या सूर्याचा देश , जगात सर्वाधिक भूकंप होणारा देश , भारताच्या चीनविरोधी आघाडीतील महत्त्वाचा देश , जुन्या हिंदी चित्रपटातील    सिने दिगर्शक ज्या देशाच्या अल्पावधीत झालेल्या प्रगतीमुळे  भारावून गेले तो देश म्हणजे जपान , आत्ताआत्ता पर्यंत भारतातील बाळ गोपाळांच्या करमणुकीचे महत्त्वाचे साधन असलेल्या डोरेमॉन , सिंच्यान निज्जा हतोरी आदी अनेक कार्टून चा निर्माता असणारा देश म्हणजे जपान , स्वामी विवेकानंद यांनी ज्या२ देशाचा उल्लेख सध्या ते  निद्रिस्त  ड्रॅगन  आहेत जे उठल्यावर   जगाची झोप उडवतील अशा उल्लेख केला होता त्यातील एक देश म्हणजे जपान . ज्या देशाबरोबर आपल्या भारताच्या नियमित बैठका होतात अश्या जगातील मोजक्या देशांपैकी एक म्हणजे जपान ज्या देशाच्या तांत्रिक साह्यावर आपल्याकडे अनेक सोईसुविधा उभारण्याचे कार्य सुरु आहे तो देश म्हणजे जपान .तर अश्या जपानचे पंतप्रधान  फुमिओ किंशिंदा   हे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून १९ आणि २०मार्चला  ला, भारतात आले होते  सन २०१४ पासून नियमितपणे भारत जपान यांच्यात वार्षिक बैठका होतात   त्याच्या १४ व्य अधिवेशनासाठी ते आले