पोस्ट्स

नोव्हेंबर १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ?

इमेज
        जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर   तर नाही ना ? अशा प्रश्न उपस्थित व्हावा ,  अशी घडामोड १६   नोव्हेंबर रोजी जागतिक प्रमाण वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास ,   युक्रेन पोलंड सीमारेषेपासून सहा किलोमीटर दूर असणाऱ्या एका पोलंडच्या खेडेगावात घडली . बीबीसीने सर्वप्रथम दिलेल्या बातमीनुसार रशियन   एक क्षेपणास्त्र   तर स्थानिक प्रमाणवेनुसार पहाटे पावणेचारच्या सुमारास पोलंड आणि युक्रेन या सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर अंतर पोलंडचा हद्दीत कोसळले ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले   या हल्ल्याचे वृत्त समजताच इंडोनेशयातील बाली शहरात सुरु असलेल्या जी २० चे १७ वे अधिवेशन तात्कळ थांबवून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या अध्यक्षतेखाली जी ७ आणि नाटो राष्टांची बैठक झाली या बैठकांमधून आपणास   जागतिक स्तरावर या घटनेचे किती गंभीर प्रतिसाद उमटले आहेत हे समजून येते या बैठकीच्या वेळी  रशियाचे अध्यक्ष ब्लडमिर पुतीन उपस्थित होते जी २० या परिषदेला उपस्थित असणारे रशिय

भवताल एक अत्यंत वाचणीय दिवाळी अंक

इमेज
              आपल्या महाराष्ट्राला दिवाळी अंकाची शतकौत्तर वर्षाची परंपरा आहे. अनेक विषयांवरचे दिवाळी अंक महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. जे एखाद दुसरा अपवाद वगळता अत्यंत वाचणीय असतात. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची दिवाळी एक वेळ चकली, अनारसे अस्या खाद्य पदार्थाशिवाय साजरी होवू शकते, मात्र दिवाळी अंकाशिवाय होणे अशक्यच असे बोलले जाते .तर अस्या गौरवशाली परंपरेचा भाग होण्यासाठी मी नुकताच भवताल हा दिवाळी अंक वाचला तो कसा वाटला , हे सांगण्यासाठी आजचे लेखन          तर मित्रांनो, पर्यावरण या विषयासाठी वाहिलेल्या भवताल या दिवाळी अंकाचे हे सलग ८वे वर्षे ,या आधी भुजल, सुक्ष्मजीव, परंपरागत जलव्यवस्था, पाउस,खडक देवराई ,अधिवास या विषयांवर भवतालकडून विशेषांक काढण्यात आले आहे. या वर्षी त्यांनी सडे पठार या विषयांवर आपला दिवाळी अंक काढला आहे. आपल्याकडे पश्चिम घाटात आणि जगभरात विविध ठिकाणी जिथे पश्चिम घाटासारखी स्थिती आहे. तिथे डोंगर दऱ्यात, घाटमाथ्यावर पठारी प्रदेश आढळतो. आपल्याकडे त्यास सडे पठार म्हणतात.   लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक पर्यावरणीय.पत्रकारीता करणारे अभिजीत घोरपडे, यांच्या संपादकीय मार्गदर्