पोस्ट्स

नोव्हेंबर १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मागण्या योग्य सादर करायची पद्धत अयोग्य

इमेज
               सध्या आपल्या महाराष्ट्रात एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ऐन दिवाळीत दळणवळण  थंडावले आहे . एसटीच्या स्वतःच्या विचारानुसार ऑक्टोबर ते मार्च हा हंगाम गर्दीचा असतो त्यामुळे या काळात एसटीच्या आवडेल तिथे फिरा या पासच्या किमतीत वाढ होत असते . आणि याचा काळात एसटीच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे .एसटी कर्मचाऱ्यांचा संघर्ष समितीने संप संपल्याचे जाहीर केल्यावर सुद्धा कर्मचाऱ्यांचे समाधान न झाल्याने कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने संप सुरूच ठेवल्याने राज्यात दळणवळण बऱ्याच मोठ्या प्रमाणात थंडावले आहे सरकारने सुद्धा तुम्ही कामे सुरु करा आपल्या मागण्याबाबाबत विचार करण्यात येईल असे आवाहन केले आहे मात्र त्यास कर्मचाऱ्यांकडून  थंड प्रतिसाद मिळत आहे परिणामी  एसटी कर्मचाऱ्यांचा मागण्या कितीही रास्तवाजवी असल्या तरी त्यांच्या विरोधात संतापाची भावना प्रवाश्यांमधून उमटत आहे . हे कर्मचारी आधीच आमच्याशी उध्द्त वागतात . जर यांना राज्य सरकारमध्ये पूर्णतः सामावून घेतले तर , त्यांच्या अरेरावी मध्ये भरच पडेल अश्या प्रकारची भावना उमटत आहे तर एसटी कर्मचाऱ्यांक