पोस्ट्स

ऑगस्ट ५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

इमेज
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलच . बंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे   . भारतासाठीचे बदल आपण  तीन   प्रकारात विभाजित करू शकतो . पहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात , ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या   सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌ ईशान्य भारताचा विचार करत