पोस्ट्स

जून ८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खैरात संपली गुणवत्ता घटली

इमेज
                                 आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या  निकालाचे  वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली  . परिणामी  यावर्षी गेल्या  बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद  करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ  अशीच सुरु राहिली   तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते  .       गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा  पद्धती यामुळे  गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहवाल येत असताना दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे डोळे दिसपवून टाकणारे निकाल यातील तफावत यामुळे कमी होईल अशी अशा करण्यास हरकत नसावी .                   विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण  जास

मराठी अनूवादित साहित्य आणि मी

इमेज
                             गेले काही दिवस मी स्वामी विवेकानंद यांच्या जिवनावरचे "अचेना अजाना विवेकानंद " नावाचे मुळचे बंगालीत असणारे माञ राजहंस प्रकाशनाने "अज्ञात विवेकानंद" नावाने मराठीत आणलेले पुस्तक वाचत आहे . मुळ पुस्तक बंगली साहित्यातले मानाचे समजले जाणारे आनंद आणी बंकिम पुरस्कार प्राप्त मणीशंकर मुख्योपाध्याय उर्फ शंकर यांनी लिहलयं प ुस्तक उत्तम आहे . ते जेव्हा वाचून संपेल तेव्हा पुस्तकाविषयी लिहीलच .मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते मराठीत येणाऱ्या  अनुवादीत पुस्तकांकडे अन्य भाषेतील खुप पुस्तके मराठीत अनुवादित होत आहेत माञ माझ्या अल्पशा अश्या अनुभवाचा नजरेतून बघीतले तर त्याचा तूलनेत खुपच कमी पुस्तके मराठीतून अन्य भाषेत भाषातरीत होतात .मराठीत सुध्दा प्रचंड स्वरुपात अत्यंत सकस साहीत्य निर्मीती होते माञ ही निर्मीती मराठीत्तेर भाषिकांना समजण्यासाठी आवश्यक असणारी ते साहित्य अन्य भाषेत अनुवादित होताना मला तरी आढळलेले नाही . माझे अनुभव विश अत्यंत तोकडे आहे याची मला पुर्ण जाणीव आहे .तरी जे काही अनुभव विश्व आहे त्याचा परीपेक्षात राहुन मी हे विधान केले आहे .