पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत आणि सौदी अरेबिया संबंधांना येणार बळकटी

इमेज
           सौदी अरेबिया . जगातील सर्वात जास्त तेल साठे असणारा देश , मुस्लिम बांधवांच्या प्रमुख तीन धार्मिक स्थानापैकी पहिल्या दोन क्रमांकाची   स्थान असलेल्या मक्का , आणि मदिना हि  पवित्र शहरे ज्या देशात आहेत तो देश म्हणजे सौदी अरेबिया ( तिसरे स्थान म्हणजे जेलुसरेम या  तिन्ही इब्राहिम रिलिजनसाठी {इस्लाम , ख्रिश्चन आणि ज्यू या तिन्ही धर्मांच्या  धर्म ग्रंथात उल्लेख असलेल्या इब्राहिम या देवदूतावरून या धर्मांना इब्राहिम रिलिजन म्हणतात }   पवित्र असणाऱ्या  शहरातील अल अस्का  मशीद ) ज्या देशाचे क्षेत्रफळ जगातील दहाव्या क्रमांकाचे असून देखील ज्या देशातून एकही नदी वाहत नाही तो देश म्हणजे सौदी अरेबिया , ज्या देशाच्या उत्तरेकडील काही भूभाग वगळता अन्य सर्व क्षेत्रात वाळवंट आहे तो देश म्हणजे सौदी अरेबिया . जो देश तेथील कडक कायद्यांमुळे प्रसिद्ध आहे तो देश म्हणजे सौदी अरेबिया . १९३२ साली अधिकृतरित्या स्थापन झालेला अद्याप राजेशाही असणारा राज्याच्या नावावरून देशाचे नाव असणारा देश म्हणजे सौदी अरेबिया .ज्या देशात स्थापनेपासून गेल्या ९० वर्षात संस्थापक राज्याच्या विविध मुलांनीच सत्ता सांभाळली तो देश म्ह

लक्ष्मी पुजन विशेष

इमेज
दिवाळीचा पाच दिवसांपैकी सर्वात महत्तवाचा दिवस अर्थात लक्ष्मी पुजन . या दिवशी आबालवृद्ध   धनाची देवी अर्थात लक्ष्मीची पुजा करतात . या   दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे . सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे ; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे . हा दिवस शुभ मानला आहे ; पण तो सर्व कामांना नाही ; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्यअमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात . आम्हाला समृध्द करणारी दिव्यता , ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे . भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते . घर असो किंवा कार्यालय … . दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते . दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . दिव्यां

नरक चतूर्दशी विशेष

इमेज
  आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतूर्दशी . आजच्या दिवशी पहाटे लवकर   सुर्योदयापुर्वी उठून सुवासिक उठणे तेल आदी लावून स्नान करण्याची प्रथा आहे . आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या   नरकासुराचा वध केला , अशी आख्याईका आहे या बाबत श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे की ,  प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता . देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला . हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला . त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला . त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला . श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले . मरतांना नरकासुराने कृ ष्णाकडे वर मागितला , ‘ आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील , त्याला नरकाची पीडा होऊ नये .’ कृष्णाने तसा वर त्याला दि