पोस्ट्स

जानेवारी ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एकाग्रता कशी वाढवायची ? (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग ११ )

इमेज
       बुद्धिबळाच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता किती महत्वाची असते ? हे आपण गेल्या काही भागात बघितले या भागात आपण एकाग्रता कशी वाढवायची ? हे आपण बघूया एकाग्रता बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे दुसरा गुण शिस्त आहे या शिस्तीविषयी आपण पुढच्या भागात बघूया .   एकाग्रत्तेबाबाबत सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत एकाग्रतेबाबत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे ते म्हणतात, " एकाग्रता हा जन्मजात गुण  आहे मात्र आपण त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो . डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानवर . वकिलाने  लढायला घेतलेल्या खटल्याववर आणि खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले तर तर खूप काही साधता येईल , किंबहुना यशाची गुरुकिल्ली एकाग्रचित्रात आहे असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही            क्रिकेटच्या खेळातील एकाग्रचित्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉट घेता येईल फलंदाजी करताना त्याची एकाग्रचित्रता मुळीच ढळत नसे समोरच्या संघाने शेरे मारून डिवचवावे . किंवा गर्दीने हुल्लतबाजी करावी , बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम होत नसे तो धावांचा पाऊस पाडत असे . रोहन कन्हाप आणि गॅरी सोबर्स या