पोस्ट्स

मे ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अखेर करावेच लागले

इमेज
४ मे २०२२ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून कोणाच्याही ध्यानीमनी नसताना रिवर्स रेपो दारात ४० बीपीएसची वाढ करण्यात आली  (१०० % रेपोदरात १ टक्यांची वाढ केली असता ती १ बीपीएस समजली जाते )   ज्यामुळे बँकांना त्यांच्या ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज द्यावे लागेल . त्याच प्रमाणे कॅश रिझर्व रेशो मध्ये ५० बीपीएसची वाढ करण्यात आली ज्यामुळे बँकांना ग्राहकांना कर्ज देण्यास कमी निधी प्राप्त होईल परिणामी या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन बाजारातील पैसाचा  पुरवठा कमी होईल . बाजारातील पैशाचा पुरवठा कमी झाल्याने महागाई कमी होईल असा रिझर्व बँकेच्या अंदाज होता . सर्वसाधारणपणे या दरांचा आढावा रिझर्व बँकेकडून दर दोन महिन्यांनी घेण्यात येतो मागच्या एप्रिलमध्ये रिझर्व बँकेने दारात बदल केला नव्हता त्यामुळे जूनमध्ये व्याजदर बदलतील अशा अंदाज होता मात्र देशातील महागाई बघता मध्येच मे महिन्यातच रिझर्व बँकेकडून व्याजदरात बदल करण्यात आला  आपण ज्या बँकांकडून कर्ज घेतो, त्या बँकांंना रिझर्व बँंकेकडून वित्त पुरवठा होतो. हे करण्यासाठी रिझर्व बँकेकडून आपल्या बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा होतो, त्याचे कालावधीनुसार र