पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी

इमेज
            आपल्या मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण म्हणजे "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी". एखादी समस्या सोडवण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सोडून इतरच उपाययोजना करणे, यासाठी ही म्हण वापरली जाते. बंगळुरु येथील  इंडियन इनस्टिट्युट आँफ सायन्स मधील वसतिगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याचा प्रकार बघितला, तर सध्या प्रशासनाकडून याच म्हणीसारखे वर्तन घडत आहे, असे म्हणावे लागेल.  विद्यार्थी छतावरील पंख्यांचा वापर करत आत्महत्या करत असल्याने त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याऐवजी ते छतावरील पंख्याचा वापर करतात. म्हणून छतावरील पंखे काढण्याचा प्रताप इंडियन इनस्टट्युट आँफ सायन्स प्रशासन करत आहे.पंखे काढल्यानंतर आत्महत्या थांबतील असे या प्रशासनास वाटते.मात्र सध्या असणारे छतावरील पंखे काढून टाकल्यास विद्यार्थी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत आत्महत्या करतील. मग ते पण तोडणार का? आणि पहिले साधन तोडल्यामुळे दुसऱ्या साधनाद्वारे आत्महत्या  करण्यास सुरवात केल्यामुळे ते तोडणार असी साखळी किती दिवस चालणार ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे .मुळात विद्यार्थ्यांचा आत्महत्या रोखण्यासाठी म

स्वागत उत्तरायणचे –

इमेज
 आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच की, या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात तर मित्रानो, आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ बुधवारी  २२ डिसेंबरला होत आहे. त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया         पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान. सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो. मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो. अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात.  या भासमान भ्रमणात सूर्य जेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो. ज्या बिंदूपासून तो परत उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दि