पोस्ट्स

मे १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवतेला काळीमा !

इमेज
  शनिवार, 8 मे 2021 अफगाणिस्तानातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी काळरात्र ठरली. अफगाणिस्तानची राजधानी काबूल पासून जवळच असणाऱ्या पश्चिम काबूल जिल्ह्यातील दशत् इबारची  या ठिकाणी  असणाऱ्या syed Al Shahda   या शाळेजवळ तीन बाँम्बस्फोट झाले. या स्फोटात 150 जण जखमी झाले .तर 58 जण मृत्युमुखी पडले.मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 11ते15 वर्षाच्या विद्यार्थींनीचा सर्वाधिक समावेश आहे. या स्फोटात पुरुषांचा तूलनेत महिलांचे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रमाण अधिक आहे.  शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दहा मिनिटाच्या अंतरात  झालेल्या या बाँम्बस्फोटाने मानवतेलाच काळीमा फासली आहे.   स्फोट झाला, त्याचा आसपास अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असणाऱ्या शिया हजारा या लोकांची वस्ती आहे.  तीन सत्रात भरत असणाऱ्या  syed Al Shahda    या शाळेत दुसऱ्या सत्राची फक्त मुलींसाठी असणारी शाळा सुटताना हा स्फोट झाला. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत. अफगाणिस्तानातील प्रशासनामार्फत हा स्फोट तालीबानने केल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्र तालीबानने या स्फोटाची जवाबदारी नाकारली असून या स्फोटामागे इस्लामिक