पोस्ट्स

जानेवारी १४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जोशीमठाच्या आपत्तीतून आपण घ्यावयाचे धडे

इमेज
                   उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या शहरात भौगोलिक स्थितीमुळे झालेली आणीबाणीची स्थिती ऐव्हाना आपणास मोठ्या प्रमाणात माहिती झालेली असेल.विविध भुगर्भ शास्त्रज्ञांनी या आधी दिलेले सुरक्षेतेचे इशारे देखील आपणास माध्यमांमार्फत आपणास ठाउक असतील जोशीमठ येथील संकट भयानक आहेच ,यात शंकाच नाही. मात्र पुर्णतः जोशीमठ सारखेच नाही मात्र त्याच तीव्रतेचे संकट आपल्या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे कोकणाचे .              कोकणचे भुगर्भ अत्यंत सुरक्षीत असले तरी  सयुंक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय संघटनेने कोकणच्या  पर्यावरणाचा समावेश पृथ्वीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरणात करण्यात केला आहे. कोकणात मोठे प्रकल्प नको असा अहवाल माधवराव चितळे आणि गाडगीळ समितीमार्फत आधीच देण्यात आला आहे. तरीदेखील काही प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकली तर आश्चर्य वाटायला नको. उत्तराखंड राज्यात देखील या आधी देण्यात आलेले सुरक्षीतचे नियम पायदळी तूडवल्याचे परीणाम आपण बघत आहोतच. तोच धोका कोकणात देखील आहे. विकासाबाबत नव्याने  विचार करायची वेळ आली आहे, हेच यातून सिद्ध होत आहे.      

हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ?

इमेज
राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या  परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारीवर्गाच्या पदावर  नियुक्तहोण्यासाठी प्रयत्नशील युवकांच्या  आणि युवतींच्या आंदोलनाने १३ जानेवारीचा संपूर्ण दिवस धगधगता ठेवला . ज्याचा जोर प्रामुख्याने पुण्यात होंता मात्र औरंगाबाद कोल्हापूर या  शहरांसह  राज्यभरात ठिकठिकाणी  याबाबतचे आंदोलन झाले .गेल्यावर्षी  २६ जूनच्या  सुमारास महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने अभ्यासात केलेले बदल मागे घेऊन जुन्याच पद्धतीनेपरीक्षा घेण्यात याव्यात अशी उभा भावी अधिकाऱ्यांची (?) मागणी आहे आम्ही सुमारे  दोन वर्ष आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहोत . आम्हाला इतक्या  लवकर हे बदल स्वीकारत नव्याने अभयास करणे जमणार नाही तरी या बदलानुसार परीक्षा २०२५ पासून घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे          या भावी अधिकऱ्यांची मागणी लक्षात घेतल्यास एक  प्रश्न निर्माण होत आहे ज्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे  लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच .तर तो प्रश्न आहे  हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ? प्रशासनात घर गाड्या तसेच अन्य सोयीसवलती मोठ्या प्रमाणत मि