पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मन विष्णण करणारी आकडेवारी

इमेज
आपण समस्त भारतीय लोक या करोना काळात येणाऱ्या आगामी सणांच्या तयारीत मग्न असताना, गेल्या आठवड्यात एक मन विष्णण करणारी एक आकडेवारी समोर आली. ही आकडेवारी होती जगभरातील  उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांचा  विविध प्रकारे अभ्यास करून त्या आधारे देशांची क्रमवारी केल्यावर भारताला मिळणाऱ्या क्रमांकाबाबतची . आर्यलँड या देशातील मानवतेसाठी काम करणारी सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असणाऱ्या  कॅन्सल्ट वर्ल्ड वाईड  आणि  आणि जर्मनीतील महत्त्वाची स्वयंसेवी संस्था असणारी वेल्थ हंगर लाइफ   या दोन स्वयंसेवी संस्थांनी जगभरातील  देशांचा विविध प्रकारे अभ्यास करुन तयार केलेल्या आकडेवारीत भारताचा क्रमांक होता 94वा . या आकडेवारीत जितका क्रमांक कमी तितकी देशातील स्थिती उत्तम होय. यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे हिंदी भाषेतील कित्येक वृत्तवाहिन्यांच्या मते पृथ्वीवरचा नरक असलेल्या पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षा उत्तम असल्याचे या अहवालात नमुद  करण्यात आले आहे . सार्क देशातील अफगाणिस्तान या देशाचा अपवाद वगळता अन्य सर्व देश भारतापेक्षा सरस कामगिरी करत असल्याचे यावेळी दिसून आले आहे.सन 2006 पासून हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध करण्यात ये