पोस्ट्स

प्रशासन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इमेज
 मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपा...

महाराष्ट्रात एकत्रीतपणे होणाऱ्या निवडणूक या एक देश निवडणूकीची सुरवात ?

इमेज
महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी निवडणूक सुधारणा म्हणून ज्या गोष्टीकडे बघितले जाते, ती गोष्ट म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन ही प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका बघता जवळपास  सर्वच जिल्हा परिषदा  पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका जर मुदतपूर्व झाल्या नाहीत, तर पुढल्या पाच वर्षांनीच एकत्रितच होतील. त्यामुळे हाच मुद्दा अन्य राज्यात राबवत नरेंद्र मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन या आपल्या या आपल्या सुधारणा कार्यक्रमाला अप्रत्यरित्या सुरुवात केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्यक्षात पाहता, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेनुसार होत आहेत, असे म्हणता येणार नाही.  सोशल मीडिया होणाऱ्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा हा दुर्लक्षीला जातोय, किंबहुना असा काही मुद्दा आहे, हेच अनेकां...

जो बायडेन यांच्या माघारीचे कवित्व !

सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्यांन...