पोस्ट्स

एप्रिल १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानातील लोकशाही

इमेज
          ९  एप्रिलच्या रात्री आणि १० एप्रिल च्या पहाटे आपल्या लोकसभा सदृश्य पाकिस्तानच्या सभागृहात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या ज्याची अंतिम परिणीती पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांची गच्छन्ति होण्यात झाली . ज्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळ पूर्ण न करण्याची परंपरा अबाधित राहिली . मुळात आमरण खान यांचीपदावरून गच्छन्ति होणार हे या आधीच स्पष्ट झाले होते मात्र बुडणाऱ्या जहाजाचा कप्तान जसे शेवटपर्यंत आपली जागा सोडत नाही बुडणारे जहाज वाचवण्याचा निकराने प्रयत्न करतो त्या प्रमाणे विविध व्यक्तींकडून इम्रान खान यांना पदाचा राजीनामा देत सम्मानाने पायउतार होण्याचा सल्ला मिळत असताना देखील इम्रान खान यांनी अखेरपर्यंत सत्ता ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला इम्रान खान यांच्या या प्रयत्नांमागे पाकिस्तानच्या मागच्या पंतप्रधानाची पायउतार  गच्छन्ति झाल्यावर होणाऱ्या  परिस्थितीची देखील पार्श्वभूमी होती हे नाकारून चालणार नाही त्या पंतप्रधानाची झाली तशी दुर्दशा आपली होऊ नये यासाठी त्यांनी निकराने प्रयत्न केले त्यांचे प्रयत्न यशस्वी होत आहेत असे वाटत होते किंबहुना ज्