पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धिबळातील महासत्ता भारत

इमेज
               बुद्धिबळातील महासत्ता भारत आहे ,हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या  वारंवार प्रत्ययास येत आहे . नाशिकचे आयकॉन  ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या युरोपीय क्लबमध्ये चमकदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत १० क्रमकांची झेप घेत पुन्हा एकदा जगातील पहिल्या २५ खेळाडूंच्या क्रमवारीत स्थान मिळाल्यामुळे समस्त बुद्धिबळपटू आनंदात असताना , बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशनइंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे कडून जाहीर करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीमुळे दुग्धशर्करा योगाचीच प्रचितीच येत आहे .आजमितीस पुरुष खेळाडूंचा विचार करता जगातील पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ५ खेळाडू आहेत तर महिला खेळाडूंचा विचार करता पहिल्या ३५ खेळाडूंमध्ये ३ खेळाडूंचा समावेश आहे जर सांघिक कामगिरीचा विचार केला तर भारत पुरुषांचा आणि महिलांचा गटात  तिसऱ्या स्थानी आहे तर या वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या महिला आणि पुरुषांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचा विचार करता सुद्धा भारत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे .अनेक भारतीय बुद्धिबळपटूंनी गेल्या काही महिन्यात अनेक बुद्धिबळ स्पर्धा खिश्यात घातल्या आहेत नुकतीच म