पोस्ट्स

डिसेंबर २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२२ क्रीडा,

इमेज
       सरते २०२२ हे वर्ष क्रीडा जगताचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . जागतिक स्तराचा विचार करता अनेक वाद प्रतिवाद , टीका यावर्षी क्रीडा जगतात झाले एका संघाच्या  समर्थकांनी दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांशी प्राण जाईल इतक्या टोकाची मारामारी करण्याची घटना देखील यावर्षी जगाने अनुभवली . जगातिक स्तरावर मनाचा समजल्या जाणाऱ्या आणि काही वर्षांच्या अंतराने होणाऱ्या दोन स्पर्धा यावर्षी झाल्या .  एक भारतासाठी अत्यंत महत्वाची मात्र क्रीडा जगतात फारशी महत्वाची न मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत  एक धक्कादायक पराभवाला भारताला सम्रोरे जावे लागले ते या बघता हे वर्ष भारतासह जगसाठी अत्यंत वादळी ठरले         या वर्षाची सुरवातच मुळी झाली राफेल नदाल , रॉजर फेडरलसह ३० ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या आणि जानेवारी २०२२ ची पुरुष खेळाडूंची जागतिक क्रमवारी बघता पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या नोवाक जेकोविच यास त्याने कोव्हीड १९ चे लसीकरण पूर्ण न केल्याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या वेळापत्रकातील पहिली स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवर येण्यास ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी प्रखर विरोध केल