पोस्ट्स

फेब्रुवारी २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवकाश क्षेत्रातील उभरती महासत्ता भारत !

इमेज
            सन 2021 चा राष्ट्रीय विज्ञान दिन भारताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहला जाईल . कारण या दिवशी भारताने  आपण अवकाश क्षेत्रातील ऊभारती महासत्ता असल्याचे जगाला दाखवूंन दिले आहे . या दिवशी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .   ब्राझील येथेही संशोधकांनी भारतीय संशोधकांच्या मदतीने स्वतः तयार केलेल्या अमोझोन 1 या उपग्रहांसह मेक्सिको देशाच्या एका उपग्

अत्यावश्यक महत्त्वाचा मुद्यांंना बगल

इमेज
व्यवस्थापनशास्त्रात कामाचे 4 प्रकारे विभाजन करण्यात येते. पहिल्या प्रकारात   महत्तवाची  आणि तातडीने करायला हवी असी कामे येतात.सध्याचा करोनाचा काळ वगळता इतर वेळचा विचार करता विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना परीक्षेचा अर्ज भरणे , हे या प्रकारचे काम म्हणता येईल. दुसऱ्या प्रकारात काहीसी  कमी महत्त असणारी  जी कामे केली नाही तरी चालेल मात्र जर करायची असल्यास आताच  करावी लागतील असी कामे येतात. उदाहरणार्थ हाउसफुल होणाऱ्या चित्रपटाला येतोस का? असे मित्रांनी विचारल्यावर येणारा प्रतिसाद तर   तिसऱ्या प्रकारात जी कामे करणे अत्यावश्यक आहेत. मात्र ती कामे आताच तातडीने केली पाहिजे असे नसते अशी कामे येतात. उदाहरणार्थ एखादे नविन कौशल्य शिकणे. तर चौथ्या प्रकारात जी कामे आताच तातडीने करायची गरज नसते. किंबहूना जी कामे केली नाही तरी चालू शकते, असी कामे येतात. उदाहरणार्थ व्यसन करत कट्यावर बसणे.  हे सविस्तर सांगायचे कारण म्हणजे 2021 फ्रेबुवारी 28 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी मन की बात या कार्यक्रमात केलेले भाष्य .    माझ्यामते यात सांगितलेले सर्व कार्यक्रम हे तिसऱ्या प्रकारात मोड