पोस्ट्स

मे २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

.हॅप्पी बर्थडे अहमदनगर

इमेज
    आज 28 मे 2022 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 533 वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 533 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .              अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी निवडणुकीत वचन द्यावे असे शहर . आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरा दरम्यान धावली . त्यापैकी एक शहर जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांना बाजारपेठेत येण्यासाठी , ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर .  आपल्या भारतातील महत्तवाची वाहन कंपनी असणाऱ्या कायनेटिक कंपनीचे मुख्यालय असणारे अहमदनगर . लष्कराच

शनी जयंती विशेष !

इमेज
   भारतीय तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या  दिवशी भगवान सुर्याची प्रथम  पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहे.  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू  चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती  चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार  भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी  रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे  आजमितीस सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह हे शनी या ग्रहास आहे.श नीग्रहास 82 नैसर्गिक उपग्रह आहेत. यातील सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमालीकेतील ज्या एकमेव उपग्रहावर वातावरण आहे  तो म्हणजे टायटन होय  ज्या खगोलीय वस्तूच्या उपग्रहावर आज ह