पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नरक चतूर्दशी विशेष

इमेज
          आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतूर्दशी . आजच्या दिवशी पहाटे लवकर  सुर्योदयापुर्वी उठून सुवासिक उठणे तेल आदी लावून स्नान करण्याची प्रथा आहे .आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या  नरकासुराचा वध केला  , अशी आख्याईका आहे या बाबत श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे की,   प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला , ‘ आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील ,  त्याला नरकाची पीडा होऊ नये. ’  कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही  ‘ नरक चतुर्दशी ’  मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्न

जिएसटी संकलन किती खरे किती खोटे !

इमेज
          केंद्र सरकारकडून 2 नोव्हेंबर रोजी जीएसटी संकलन सुरु झाल्यापासूनच दुसऱ्या क्रमांकाचे जीएसटी संकलन ऑक्टोबर महिन्यात झाल्याचे जाहीर करण्यात आले . ज्यामुळे कोरोना संसर्गाच्या काळातील अर्थव्यवस्था मूळ पदावर येऊन वेगाने विकासाच्या मार्गावर धावत असल्याचे सांगण्यात येत आहे . जे अर्धसत्य आहे . जीएसटी संकलन वाढले आहे,  हे मान्य केले तरी यातील वाढ वस्तूच्या मागणीत वाढ झाल्याने अधिक वस्तू विकल्या गेल्याने नाही तर  वस्तूच्या मूळ किमतीत  वाढ झाल्यानेआणि जीएसटी विक्री किमतीवर आकारला जात असल्याने आहे .  हे आपण सिलेंडरच्या किमतीद्वारे सहजतेने समजून घेऊ शकतो    एलपीजी सिलिंडरची ऑक्टोबर २०२० ची जिएसटी सोडूनची किंमत ५६५ रुपये ७१ पैसे तर ऑक्टोबर २०२१ ची किंमत ८४१ रुपये ९० पैसे ५६५.७१ रुपयांचा ५ टक्के जीएसटी २८.२८ रुपये. ८४१.९० रुपयांचा ५ टक्के जीएसटी ४२.०९ रुपये. किमतीत वाढ २९० आणि जीएसटीची वाढ १३.८१ रुपये. सिलिंडरच्या खपात कुठलीही वाढ न होता किंमती वाढल्याने जीएसटीच संकलन वाढलेले आपणस दिसत आहे काही अर्थतज्ञांच्या मते जुलै २०१७ च्या तुलनेत काही उत्पादनाच्या किमती वाढण्याचा वेग ३५ ते ४० टक्के आह