पोस्ट्स

ऑक्टोबर १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच

इमेज
      सध्या महाराष्ट्रात परतीच्या मांसुमने अत्यंत धुमाकूळ घातला आहे . पुणे शहारत तर फ्लॅश फडाची स्थिती अनेक ठिकाणी दिसली आहे नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत कमी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे नाशिक आणि पुण्याखेरीज अन्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाने कापणीस आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान केले आहे तसेच पेरणीस तयार असलेल्या रब्बी पिकाच्या बाबतीत सुद्धा  शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत  महाराष्ट्रातील या अडचणीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास  "पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच " असेच करावे लागेल .            या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासूनच जगभरात अमेरिका ऑस्टेलिया , दक्षिण आफ्रिका , जपान फिलिपाइन्स ,पाकिस्तान . जर्मनी फ्रांस आदी अनेक देशात पावसाने आपला प्रताप दाखवत तेथील प्रशासनास अक्षरशः घाम फोडला होता . ऑस्ट्रेलिया देशातील क्वीन्सलँड व्हिटोरीया या राज्याच्या गव्हर्नसने गेल्या  एका हजार वर्षात  आमच्याकडे सध्या पडत आहे तसा पाऊस पडलेला नाही असे उदगार काढले होते. दक्षिण आफ्रिका देशातील जोहान्सबर्ग या शहराच्या जवळ पावसानेभूस्खलन होऊन ३५० लोक प्राणास मुकले होते