पोस्ट्स

ऑक्टोबर ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
          आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात . आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात .  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके , सिने निर्माते , सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात . या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल . आपल्या बाँलीवूडमध्ये पुर्वी कार्यरत किंवा आता कार्यरत असणाऱ्या सिने दिग्दर्शक , सिने निर्मात्यांपैकी काही मोजकेच सिने निर्माते सिने दिग्दर्शक असे आहेत की ,  ज्यांचे सर्वच्या सर्व चित्रपट कितीही वेळा बघीतले तरी कंटाळवाणे न होता , काहीतरी नविन बघत आहोत असे वाटते . दरवेळी चित्रपटातील कोणता तरी नवा पैलू आपणास गवसतो . अश्या मोजक्या सिने दिग्दर्शक सिने निर्मातांपैकी एक असणारे व्यक्तीमत्व म्हणजे वसंतकुमार शिवशंकद पदूकोन अर्थात गुरुदत