पोस्ट्स

मे १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानसोपचारावर इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक सायको थेरपीज !

इमेज
       समर्थ रामदास स्वामी यांनी " मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण"  या सारख्या अभांगातून कोणत्याही कार्याच्या यशस्वीतेसाठी मनाची निरोगी अवस्था  का आवश्यक असते हे सांगितले आहे मन हा अवयव अतिशय चंचल आहे हे ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांनी त्यांच्या कवितेतून सांगितले आहेच तर अश्या चंचल मात्र कोणतेही कार्य यशस्वीतेसासाठी आवश्यक असणाऱ्या मनाला  काही आजार जडला तर त्या मनावर उपचार करणे आलेच सध्या हे मानसोपचार करणे पूर्वीच्या तुलनेत सहजसोपे आणि कमी कलंकित असले तरी हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता मानवाच्या अस्तित्वापासूनच सुरू झालेल्या या मानसिक उपचारांच्या  अघोरी म्हणता येतील अश्या कृती कार्यक्रमांना  पूर्वी मानसिक रोग्यांना सामोरे जावे लागले आहे आता मानसोपचार पद्धती मोठ्या प्रमाणत विकसित झाली असली उपचार पद्धतीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असले तरी हे मानसोपचार या पातळीपर्यंत येण्यासासाठी अनेक मानसोपचार तज्ज्ञांचे यासाठी  अथक श्रम कारणीभूत राहिले आहेत . हे श्रम काय होते ?  मानसोपचार तज्ज्ञांनी कोणत्या प्रकारे हि उपचार पद्धती विकसित केली स