पोस्ट्स

मे ३१, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समर्थ रामदास स्वामी यांचे कांदबरी स्वरुपात चरीत्र सांगणारे पुस्तक "दास डोंगरी रहातो"

इमेज
         एखादी समजण्यास अवघड बोजड विषय जर गोष्टीवेल्हाळ स्वरुपात सांगितल्यास सहजतेने समजतो. गोष्टीवेल्हाळ स्वरुपात कथन   केल्यामुळे त्यातील अनेक महत्तवाचे दुवे निसटत असले, तरी ज्यास संबंधित विषयाची काहीच माहिती नाही, अस्या व्यक्तींना संबंधित घटकाची किमानपक्षी तोंडओळख तरी या प्रकारामुळे होते.आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरीत्र सांगणारी नेताजी ही कांदबरी, पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारीत पानिपत ही कांदबरी , रणजित देसाइ यांनी पेशव्यांच्या जिवनावर लिहलेली स्वामी ही कांदबरी असो अथवा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँ .जयंत नारळीकर यांनी लिहलेल्या विविध विज्ञान कथा याच वर्गवारीत मोडतात.याच वर्गवारीत मोडणारे आणि सुप्रसिद्ध पुस्तक म्हणजे ,'दास डोंगरी रहतो", हे पुस्तक . मराठीतील सिद्धहस्त लेखक गोपाळ निळकंठ दांडेकर अर्थात 'गोनिदा' यांनी लिहलेले हे पुस्तक समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत आपणास माहिती देते. जे मी नुकतेच नाशिक मधील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्तवाची संस्था असलेल्या सार्वजनिक वाचानालय नाशिक (सा.वा.ना.) च्या सहकार्याने वाचले.     

नेपाळ बावीस वर्षापुर्वीचा आणि आताचा !

इमेज
राजपरिवाराचे चित्र  तारीख 1 जून 2001..... स्थळ काठमांडूतील राजाचा राजवाडा ........   वेळ नेपाळी प्रमाणवेळेनुसार रात्री सव्वा नउची .....    राजपरीवातील एक सदस्य राजाचा सख्खा भाउ वगळता सर्वजण साप्ताहिक पारीवारीक भोजनासाठी एकत्र आलेले . अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना भावी राजा दिपेंद्र याने स्वतःच्या रायफलीमधून बेछूट गोळीबार केला . नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली . या गोळीबारातून भावी राजा दिपेंद्र ,   दिपेंद्रची   काकू , त्याचा चूलत भाउ , आणि त्या वेळेस तिथे नसणारा काका सोडून सर्व जण तात्काळ मरण पावतात . भावी राजा दिपेंद्रचे   3 जून रोजी निधन होते .         भावी राजा दिपेंद्रचे एका मुलीवर प्रेम होते . तो तीला घराण्याची सून म्हणून घरी आणू इच्छित असतो . मात्र राजाचा किंबहूना राणीचा त्यास विरोध असतो . यातून घराण्यात धूसफूस सुरु असते . या धूसफुसीतून भावी राजाने हे हत्याकांड केल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले . मात्र अनेकांचा मते भावी राजा दिपेंद्र असे कृत्य करण्यास धजावणार नाही . राजा