पोस्ट्स

जुलै ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्यातील दुःखे सिनेमात सहजतेने दाखवणारा सिनेनिर्माता,दिग्दर्शक.....गुरुदत्त

इमेज
           आपल्या बाँलीवूडमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये सुखी सुखी गुलाबी चित्रे रंगवणारी अनेक चित्रपटे आढळतात. आपल्या आयुष्यातील वास्तविकतेपासून चित्रपटातील दृश्ये खुप दुर असतात.  मानवी आयुष्यातील दुःखे आपल्या चित्रपटातून मांडणारे फारच कमी मोजके, सिने निर्माते, सिने दिग्दर्शक आपल्या बाँलीवूडमध्ये आढळतात. या हाताच्या बोटांवर मोजता येतील अस्या सिने निर्माते , दिग्दर्शकांमध्ये वसंतकुमार शिवशंकर पदूकोण अर्थात गुरूदत्त यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. 9जूलै ही त्यांची जयंती या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.         मानवी दुःखाना नाट्यमय कलात्मकतेने रुपेरी पडद्यावर साकरणे, आणि त्यातून मनोरंजन करणे यामध्ये त्यांचा हात त्यांचा समकालीन दुसरा कोणीच धरु शकणार नाही. गुरुदत्त यांचे सर्व सिनेमे मुख्य धारेतील होते. आर्ट फिल्म प्रकारातील नव्हते, हे आपण लक्षात घेयला हवे. सध्या काहीसे मागे पडलेल्या मधूर भांडरकर यांची याबाबत काही प्रमाणात तूलना होवू शकते. कारण मधूर भांडरकर यांचे चित्रपट वास्तवदर्शी असले तरी  फारसे हृदयद्रावक नाहीत.     प्रेमभंग, अव्हेलना, इतरांच्या यशाचे वाटेकरी होण्याची म

स्मरण ऐताहासिक उड्डीचे

इमेज
      जूलै महिना सुरु झाला की अनेक गोष्टींची आठवण होते,काही जणांना स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीची आठवण होते. काही जणांना लोकशाहीर अण्णा भाउ साठे यांची आठवण होते.या अनेक महत्तवाचा घटनांपैकीच एक गोष्ट म्हणजे 8 जूलै ची स्वातंञ्यवीर सावरकरांची ती जगप्रसिध्द समुद्रातील उड्डी.   फ्रान्सचा किनारा जवळ आलेला आहे आपण पोहत फ्रान्स गाठले तर हे ब्रिटीश सरकार आपल्याया परदेशी भूमीवर अटक करू शकणार नाही काय म्हणावे?, या नियोजनाला माझ्याकडे शब्दच नाही या गोष्टीचे वर्णन करायला. मार्सेलीस या  ठिकाणी आर्यलंड मध्ये होमरुल चळवळ चालवणाऱ्या अँनी बेझंट यांचा मदतीने स्वातंञ्यवीर सावरकर  भुमीगत होऊन भारताच्या स्वातंञ्याची चळवळ पुढे नेणार होते. माञ दुर्दैवाने त्या सावरकरांना भेटू शकल्या नाहीत आणि फ्रान्सच्या भुमीवर असूनही ब्रिटीशांनी स्वातंञ्यवीर सावरकरांना अटक केली पुढचा ईतिहास सर्वाना माहीती आहेच.  माञ मला राहून राहून वाटते जर सर्व ठरवल्याप्रमाणेच घडले असते तर ? तर इतिहास फार वेगळ्या पध्दतीने लिहला गेला असता यात तिळमाञ शंका नाही असो इतिहासाच्या वस्तुनिष्ठ अभ्यासात या जर तर च्या गोष्टीना फारशे महत्व नसतेच य