पोस्ट्स

मार्च १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुराग्रह नको.... आग्रह ठीक....!

इमेज
                               जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना एका मराठी अभिनेत्रीने काहीसी अयोग्य वाटावी, असी भाषा वापरली,आणि एका नव्या वादाला तोंड फुटले.ष च्या ऐवजी श वापरणारे किंवा उलटेही वापरणारे तसेच ण आणि न यात गल्लत करणाऱ्यांसह सर्वांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असी काहीसा दिनाच्या औचित्याला साजेशी नसणारी टिपण्णी त्या अभिनेत्रीने केली.                   बोलीभाषेत त्या त्या प्रदेशातील जीवनाचे प्रतिनिधित्व दिसत असते.प्रदेशनिहाय परीस्थिती बदलत असल्याने, बोलीभाषा देखील बदलते, अस्या वेळी सर्व प्रदेश्यातील लोकांना समजेल असी भाषा निर्माण करण्यास कोणाचीही हरकत नसावी. मात्र या प्रमाण भाषेचा दुराग्रह करत, बोली भाषांना कचऱ्याची कुंडी दाखवली जाते, तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो, जो त्या अभिनेत्रीच्या टिपण्णीमुळे निर्माण झाला आहे.                व्यक्ती आपण त्याचा मातृभाषेत  सहजतेने व्यक्त होतो असे म्हणतो, तेव्हा खरेतर तो त्याचा बोलीभाषेत व्यक्त होत असतो. हे व्यक्त होणे लेखी आणि मौखिक असे दोन्ही असते. मराठीतील अनेक बोलीभाषेत ष चा श किंवा याचा उलटे होणे, तसेच ण चा न किंवा या उ