पोस्ट्स

जून २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऐताहासिक महत्व असलेला दुर्ग ...त्रिंगलगड

इमेज
      सध्या कोरानाच्या संसर्ग कमी होत असल्याने, आणि लसीकरणास देखील वेग येत असल्याने अनेक दुर्ग मोहिमा सध्या आयोजित केल्या जात आहेत. अस्याच एका दुर्ग मोहिमेत सहभागी होण्याची मला नुकतीच संधी मिळाली. आजचे लेखन त्यात आलेल्या अनुभवांविषयी. तर मित्रांनो, वाहतूक सुरक्षा अभियानासह नदी स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव या सह विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आणि वाहतूक सुरक्षा अभियानाचे कित्येक जागतीक विक्रम करणाऱ्या गरुडझेपच्या दुर्गभ्रमती गृपच्या माध्यमातून मी नूकतीच मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी या छोट्या शहरापासून.हाकेच्या अंतरावर असणाऊ त्रिंगलगड या गडावर दूर्गभ्रमती केली. खुपच छान अनुभव होता तो.        त्रिंगल गडावर एक जैन लेणी आहे. मात्र समाजकंटकांनी लेण्याची प्रचंड दुर्दशा केली आहे. लेणी आणि किल्याची निर्मिती.दहाव्या शतकात झाल्याचे मानन्यात येते .मध्य युगात नाशिक आणि कोकणाचा व्यापार मार्गावरील मोक्याचा ठिकाणी हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी मोघलांकडून हा किल्ला जिंकला .पुढे सन 1688 मध्ये किल्ला पुन्हा मोघलांच्या ताब्यात गेला. सन1818मध्ये त्र्यंबकगड ब्रिटिशांचा अ