पोस्ट्स

एप्रिल ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील खगोलशास्त्र

इमेज
आपल्या भारतात 4 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात होणाऱ्या विधी मंडळाच्या निवडणूकीमुळे  भारत आणि महाराष्ट्र कोरोना रुग्ण संख्येमुळे महाराष्ट्र  ढवळून निघत असताना खगोलशास्त्रामध्ये दोन मोठे शोध लागल्यामुळे ते सुद्धा ढयावळून निघत आहे. मात्र आपली मराठी माध्यमांमध्ये या विषयी खुपच कमी माहिती मला दिसल्याने त्याविषयी माहिती सांगण्यासाठी आजचे लेखन         तर मित्रांनो, नुकतेच अमेरीकन संशोधन संस्था अर्थात नासाने  अँफोफेस नावाचा लघूग्रह पुढील किमान 100 वर्षे तरी पृथ्वीवर आदळणार नसल्याचे जाहिर केले आहे. सन 2004पासून पृथ्वीला धडकू शकणाऱ्या लघूग्रहांचा यादीत सातत्याने चर्चेत राहणाऱ्या या लघूग्रहाचे नाव प्राचीन इजिप्तच्या  संस्कृतीतील अराज्यकतेचा देवावरुन अँफोफेस असे ठेवले आहे. (याला god of ghose अर्थात अराज्यकतेचा देव असे टोपणनाव देखील आहे.) हा पृथ्वीवर आदळल्यास अराज्यकता पसरु शकते (प्रचंड विध्वंस होवू शकतो) असे समजून याचे नामकरण असे करण्यात आले आहे. याचा आकार 340 मीटर इतका आहे. खगोलशास्त्रज्ञांचा मते डायनाँसोर यांच्या विध्वंस झाला तसा विध्वंस होण्यासाठी एक किलोमीटरच्या लघूग्रहाची पृथ्वीबरोबर टक्कर