पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपली एसटी बदलतीये !

इमेज
          एकेकाळी लाल डब्बा म्हणून हिणवली जाणारी आपली एसटी सध्या अत्यंत वेगाने कात टाकत २१व्या शतकाला साजेशी सेवा आपल्या ग्राहकांना कंबर कसत असल्याचे दृश्य आपणास एसटीतून  महाराष्ट्रात फिरताना दिसतंय आपल्या एसटीच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत खोडोपाडी फिरले की जाणवत फक्त शहरातीलच नव्हे तर मराठवाड्यातील पाथरी , मानवत सारख्या तालुकास्तरावरील एसटी सुद्धा पूर्वी कधीही नव्हती इतक्या प्रचंड वेगाने बदलत आहे आपली अस्वच्छ , धुळीचे थरावर थर  असलेली,  बस्थानके बस्थानकांच्या इमारतीला कधी रंगरंगोटी करण्यात आली होती का ? अशा प्रश्न बघणाऱ्याला पडावा अश्या स्थितीतील बस्थानके ही प्रतिमा एसटी पुसून टाकण्यासाठी एसटी प्रशासन तोटा होत असून देखील त्यातून मार्ग काढत प्रयत्न करत असल्याचे दृश्य आपणास मराठवड्यात आणि मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणता येतील अशी खर्डा सारख्या पश्चिम महाराष्ट्रातील बसस्थानके बघितल्यास सहजतेने लक्षात येते त्यामुळे एकेकाळी एसटी बस नकोरे बाबा ! असे म्हणत तिला नाके मुरडणाऱ्या व्यक्तींना मला सांगावेशे वाटतेय, आपली एसटी बदलतीये ! हि आता पूर्वीची एसटी राहिलेली नाही तर खासगी बसवा