पोस्ट्स

फेब्रुवारी २९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"

इमेज
नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्

ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"

इमेज
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत असल्याने या इ