पोस्ट्स

जुलै १, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथा तेलाच्या दराची

इमेज
                 सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कळीचा मुदा कोणता ? याचा धांडोळा घेतल्यास इंधनाचे सातत्याने वाढणारे दर या मुद्याच्या अग्रक्रम लागेल यात शंका नाही .  दररोज वाढत जाणाऱ्या इंधनाच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी  शब्दशः पळवले आहे . आधीच करोना या महामारीमुळे घटलेले उत्पन त्यात दररोज वाढणाऱ्या दरांमुळे त्याबाबत असंतोषतात भरच पडली आहे . या भाववाढीमागे  मागे केंद्र आणि राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या करांचा वाटा मोठ्या प्रमाणात वाटा आहे , हे सर्वश्रुत आहेच . या करांमध्ये केंद्राकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचा वाटा किती ? राज्यांचा वाटा किती ?  त्याच प्रमाणे महाराष्ट्रात वसूल करणाऱ्या करांचे प्रमाण किती ? अन्य राज्यात वसूल केला जाणारा कर किती ? याबाबत विविध दावे  प्रतिदावे मी समाज माध्यमांमध्ये  बघितल्याने या बाबतची वस्तुस्थिती नक्की काय आहे ? हे मांडण्यासाठी आजचे लेखन                 विविध सरकारकडून वसूल करण्यात येणाऱ्या करांचे प्रमाण दोन प्रकारात विभाजन करता येते . प्रत्यक्ष कर , अप्रत्यक्ष कर . प्रत्यक्षकर हे करदात्याकडून प्रत्यक्ष घेतले जातात म्हणून  यास