पोस्ट्स

डिसेंबर २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या

इमेज
  ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे  कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना  काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे .       कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला समुद्रात रिक्टर स्केलवर 9 पेक

22 वर्षे विमान अपहरणाची

इमेज
           प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून एकवीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते . काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो आहे विमानाच्या मूळ मार्ग तर लाल रेषेत दाखवलेल्या मार्गावरून विमान पप्रत्यक्षात उडाले . अमृत