पोस्ट्स

नोव्हेंबर ३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अन्य देत नाही, मग आपण का देयचे ?

इमेज
                                                                नुकतेच मी आपल्या महाराष्ट्राच्या एसटीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीला भेटलो , सुरवातीचे क्षेमकुशल झाल्यावर विषय निघाला तो आपल्या लाडक्या एसटीचा . बोलण्याचा ओघात सदर व्यक्तीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपल्या भारतात सर्वाधिक सवलती देते असे सांगितले . तेव्हापासून मला प्रश्न पडला आहे की, एकीकडे महामंडळ तोट्यात असताना अनावश्यक सवलती कश्यासाठी दिल्या जात आहेत . माझ्यामते या सर्व भाडे सवलतीच्या आढावा घेऊन त्यांची संख्या किमान पातळीवर आणावी . महामंडळाचे काम माझ्या मते ज्या लोंकाकडे स्वतःच्या मालकीचे वाहन नाही त्यांना प्रवाशी सेवा पुरवणे आहे  , न की अनावश्यक भाडे कपातीच्या सेवा पुरवणे . एकीकडे महामंडळाच्या वाहक आणि चालकांना महामंडळाच्या तोट्याचे कारण पुढे करत ,  इतर राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत हास्यास्पद वाटावे , असे मानधन देयचे,  आणि दुसरीकडे आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय या म्हणी प्रमाणे , अनावश्यक प्रवाशी सवलती देत पंधरा हत्ती पोसायचा हे माझ्यामते पूर्णतः अयॊग्यच आहे .