भारत ऑस्ट्रेलिया सहकार्याचे नवे आश्वासक पर्व
येत्या काळात भारत जागचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे, याची साक्ष देणाऱ्या घडामोडी सध्या घडत आहे. १९ आणि २० मार्च रोजी जपानचे पंतप्रधान फुमिओ किंशिंदा यांची दोन दिवशीय भारत भेट होऊन २४ तास होण्याच्या आतच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॊरिशन यांच्याबरोबर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पध्द्तीने संवाद साधला जून २०२० मध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांनी ऑनलाईन संवाद साधल्यावर त्याच प्रकारे संवाद साधण्याची ही दुसरी वेळ होती पहिल्याऑनलाईन बैठकीच्या वेळी साधलेल्या संवादाचा धागा यावेळी अजून पुढे नेण्यात आला . यावेळी विविध गोष्टींसाठी एकत्रितरित्या १५०० करोड भारतीय इतक्या रक्कमेची गुंतवणूक ऑस्ट्रेलिया करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिशन यांनी जाहीर केले . या भारतीय चलनातील १५०० करोडच्या मदतीमध्ये सौर पॅनल, इलेट्रीक कार , मोबाईल या सारख्या उपकरणाच्या निमिर्तीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या लिथियम सारख्या धातूच्या बाबत भारत सक्षम होण्यासाठी करावयाच्य...