पोस्ट्स

जुलै २७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दुर्देवी घटनेचा अमृत महोत्सव

इमेज
येत्या 6आँगस्टला एका दुर्देवी घटनेला 74 वर्षे पुर्ण होवून 75वे वर्षे सुरु होईल. मानवाच्या आतापर्यतच्या ज्ञात इतिहासात फक्त दोनदा अणूबाँम्बचा वापर करण्यात आला , त्यापैकी पहिल्यांदा अणूबाँम्ब वापरण्याची ही घटना होती . जिचे दुष्परीणाम अजूनही आपणास दिसत आहे . हिरोशामा या जपानच्या शहरांवर संयुक्त संस्थाने अमेरीका या देशाने दुसऱ्या महायुद्धामध्ये जगातील पहिला अणूबाँम्बचा प्रयोग केला . या दुर्दैवी घटनेचेअमृत महोत्सवी  वर्ष ६ ऑगस्ट पासून सुरु होईल .दुसऱ्या महायुद्धात पूर्व बाजूला आघाडीवर असलेल्या जपानने या  लागोपाठच्या २ बॉम्ब हल्ल्यानंतर शरणागती स्वीकारली आणि दुसऱ्या महायुद्धाची अखेर झाली यानंतर जपानच्या राज्यघटनेत आमूलाग्र बदल झाले . त्यांना लष्कर उभारण्यास मनाई करण्यात आली .         या अणुहल्ल्याचे दुष्परिणाम अजूनही जपानमध्ये दिसतात . अनेक व्यंग असणारी बालके तिथे अजूनही जन्माला येत असतात . जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळी क्षणार्धात लाखो व्यक्ती मृत्युमुखी पडल्या , हजारो व्यक्ती कायमच्या जायबंदी झाल्या . कित्येक किलोमीटरचा  परिसर सेकंदाच्या आता जळून गेला . या धक्यातून सावरत आजचा जपान मार्ग