पोस्ट्स

जुलै १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नैसर्गिक आपत्ती आणि आपण

इमेज
    सोमवार 12जूलै रोजी उत्तर भारतासाठी काळा दिवस ठरला. राजस्थानमध्ये  विविध ठिकाणी वीज कोसळून अनेक निष्पाप जीव प्राणास मुकले. तर हिमाचल प्रदेशातील धरमशाला परीसरात ढगफुटी होवून निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवले. या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राणास मुकलेल्या जीवांना प्रथमतः भावपुर्ण आदरांजली. तसेच या दुर्घटनांमध्ये आपले आप्तेष्ठ मित्रपरीवार तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे गेलेल्या व्यक्तींना आपापले दुःख पचवण्याची ताकद इश्वर त्यांना देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना . सध्या आपल्या महाराष्ट्रात काही मान्सुमचा पाउस काही भागात मंदावला असला तरी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात त्याने बऱ्यांपैकी जोर धरला आहे.  सोमवारी घडलेल्या घटना त्याचेच प्रत्यंतर आहे.    प्रामुख्याने पावसाचा सुरवातीच्या काळात किंवा शेवटी वीज पडण्याचा घटना घडताना दिसतात. या काळात तप्त हवा आणि थंड हवा आकाशात एकमेकांना धडकतात. तप्त हवेचा दाब कमी  झाल्याने वर वर जाण्याचा प्रयत्न करतो तर थंड हवा दाब जास्त झाल्याने खाली येण्याचा प्रयत्न करते. यासर्व घडामोडीत ढगांमध्ये विद्युतप्रवाह निर्माण होतो. तो कसा होतो, याबाबत अजूनही शास्त्रज्ञांना माहिती नाह