पोस्ट्स

मार्च १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान अस्थिरतेच्या चक्रव्युहात !

इमेज
          आपल्या भारताच्या शेजारील पाकिस्तान हा देश अस्थिरतेच्या  चक्रव्युहात पूर्णपणे अडकल्याचे,  तेथील बातम्यांनुसार दिसत आहे. येत्या २७ मार्चला होणाऱ्या इम्रान खान  यांच्या अविश्वास ठरावात इम्रान खान यांची सत्ता जाण्याची शक्यता ७५ % आहे अशा अंदाज  या बाबतच्या  आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येणाऱ्या  बातम्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे . इम्रान खान यांनी  निवडणुकीसाठी उमेदवार देताना,  त्यांच्या पाकिस्तान  तेहरीके के इन्साफ या पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी,  अन्य पक्षातून येणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी दिली . अन्य पक्षातील व्यक्ती पाकिस्तान तेहरीके इन्साफ हा पक्ष जिंकू शकेल ज्यामुळे आपणास नॅशनल असेम्ब्लीमध्ये ( आपल्या लोकसभा समकक्ष सभागृहाला पाकिस्तानमध्ये नॅशनल असेम्ब्ली म्हणतात ) जात येईल असा विचार करून इम्रान खान यांच्या पक्षात येत होत्या . इम्रान खान यांचे जहाज बुडू शकते असे समजल्यावर या लोकांनी त्यांच्या पक्षातून बाहेर पडत विरोधकांशी हातमिळवणी सुरु केली आहे . ज्यामुळे कागदावर जरी इम्रान  खान यांचे संख्याबळ दिसत असले तरी वास्तवात इम्रान खान हे अव