पोस्ट्स

फेब्रुवारी १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी अनुभवलेल्या वृत्तवाहिन्या

इमेज
                 काल रात्रीची गोष्ट आहे . नेहमीप्रमाणे भारतीय मनोरंजन वाहिन्यांवर तसेच भारतीय वृत्तवाहिनीवर रटाळपणा सुरू असल्याने मी टिव्हीवर आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या बघायला सुरवात केली .या सर्फिंग दरम्यान मला सिंगापूर येथील "चँनेल न्युज एशिया "या वृत्तवाहिनीवर Politics on climate change या नावाचा कार्यक्रम दिसला . त्या कार्यक्रमांमध्ये बदलत्या हवामान बदलामूळे पाकिस्तानातील गरीब जनतेला किती हाल अपेष्टांना सामोरे जावे लागतेय, गिलबिल बाल्टीस्तान, आझाद काश्मीर भागातील हिमनग किती वेगाने वितळत आहे. यावर भाष्य केले होते .कार्यक्रमात, काय सांगितले? कोणावर टिका, केली? यावर नंतर बोलेल .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , ते कार्यक्रमाच्या विषयाकडे .                 चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीवरील अस्या कार्यक्रमाला रिपोर्ताज म्हणतात .भारतीय दुरचित्रवाणी वाहिन्यांवर "रिपोर्ताज " हा प्रकार फारच अभावाने दिसतो. त्यातही भारतात दिसतो तो दुरदर्शनचा डि डी इंडिया, डिडी भारती या वाहिन्यांवर . अन्य खासगी वृत्तवाहिन्यांवर मलातरी असे कार्यक्रम आढळले नाहीत . जर कोणाला आढळले