पोस्ट्स

जून २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या जगाचे शक्तीशाली इंजिन भारत

इमेज
   सध्या आपल्या महाराष्ट्रात राजनैतिक संकटामुळे अभुतपुर्व अस्थिरता निर्माण झाली असताना, भारत देश आगामी काळात जगाच्या राजकारणाचे शक्तीशाली इंजिन म्हणून आपला दावा अधिकाधीक मजबुत करत आहे. सध्या आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रंवाडा या देशात गेले आहेत. तिथे ते काँमनवेल्थ हेड आँफ गव्हरमेट मिटींग (जी चोगम नावाने प्रसिद्ध आहे) मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधीत्व करतील.  चोगम आँफलाईन पद्धतीने होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या ब्रिक्स परीषदेच्या 14 व्या अधिवेशात आँनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवत आहेत.. या दोन्ही ठिकाणी भारताने परस्पर सहकार्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकास साधत कोव्हिड19च्या साथीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचा मुद्दा हिरीहिरीने मांडला आहे. ज्याचे स्वागत करण्यात आले आहे.    एकेकाळी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पुर्वीच्या वसाहतवादाचे शिकार झालेल्या देशांसह युगांडा आणि रवांडा हे दोन ब्रिटीश साम्राज्याचे भाग नसणाऱ्या देशांची 1932साली स्थापन करण्यात आलेली संघटना म्हणजे काँमनवेल्थ .या संघटनेतील दोन देशांच्या अपवाद वगळता सर्व भुभागावर कधीना कधी ब्रिटीश