पोस्ट्स

फेब्रुवारी २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युक्रेनपेक्षा मोठे संकट भारताच्या शेजारी

इमेज
                 आजमितीस सर्व  वृत्तवाहिन्यांकडे वर्तमानपत्राकडे  नजर टाकल्यास सर्वत्र युक्रेनचीच चर्चा होताना दिसत आहेत .युक्रेनचे संकट मोठे आहे यात वादच नाही .मात्र   युक्रेनपेक्षा मोठे संकट भारताच्या शेजारी घोगावते आहे ते म्हणजे श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीचे संकट . माझ्यामते भारतावर युक्रेनपेक्षा आधीक वाईट  परिणाम या श्रीलंकेच्या संकटाचे होणार आहेत . रशिया आणि युक्रेन यातील कोणीही भारताबरोबर सीमा शेअर करत नाहीये मात्र श्रीलंका भारतापासून हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे तेथील घडामोडींचा परिणाम आपल्यावर मोठ्या प्रमाणात होईल , गरजवंताला अक्कल नसते अशी आपल्याकडे म्हण आहे त्या म्हणीनुसार श्रीलंकेच्या वाईट आर्थिक स्थितीचा फायदा घेत जर चीनने श्रीलंकेमध्ये आपला तळ मजबूत केला तर भारतापुढे अडचणींचा डोंगर उभा राहिल्याशिवाय दुसरे होणे अशक्यच , श्रीलंका कितीही भारताच्या बाजूने असला तरी,  जेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण होईल तेव्हा श्रीलंका भारताच्या मैत्रीला वाटाण्याच्या अक्षता लावत भारताच्या शत्रूची अर्थात चीनची मदत घेण्यास मागेपुढे बघणार नाही हे नक्की.  चीनचा आता पर्यंतचा इतिहास