पोस्ट्स

डिसेंबर १२, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक्सिटचा तिढा अंतिम टप्यावर ?? (ब्रेक्सिट भाग 6 )

इमेज
                मित्रांनो , गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून समस्त युरोप खंडातील कळीचा मुद्दा बनलेल्या ब्रेक्सिटचा तिढा आता नव्या वळणावर आलेला आहे . सदर लेख लिहीत असताना युनाटेड किंग्डममध्ये   (भारतीयप्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबर 2019 रात्रौ साडेअकरा   )हा तिढा  कोणत्या प्रकारे सुटणार,  हे ठरणाऱ्या केंद्रीय विधिमंडळाच्या  निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे . ते  जागतिक प्रमाणवेळेनुसार 12 डिसेंबरला रात्री 10  ( भारतीय प्रमाणवेळेनुसार 13डिसेंबरला रात्री साडेतीन )  पर्यंत चालेल. {या प्रकरणाची इथपर्यंत वाटचाल मी  याआधी पाच ब्लॉग पोस्ट मार्फत घेतली आहेच .ज्यांना  ती वाटचाल वाचायची असेल त्यांनी या ब्लॉग पोस्टच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे ..} या निवडणुकीचा निकाल युनाटेड किंगडम या देशासाठी अत्यंत महत्त्वाचा  आहे . गेल्या पाच वर्षातील ही तिसरी निवडणूक आहे .  या सर्व निवडणुका बेक्सिट या विषयाभोवतीच प्रामुख्याने रंगल्या आहेत . या निवडणुकीचा निकाल भारतीय प्रमाणवेळेनुसार  13डिसेंबरला रात्री साडेनऊ पर्यंत लागेल असे बीबीसीने दिलेल्या बातमीने सांगितले आहे . सध्या युनाटेड किंग्डममध्ये हिवाळ्याचे आहे