पोस्ट्स

फेब्रुवारी १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
       आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?   याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .   महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे   अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते .मात्र या स