पोस्ट्स

एप्रिल २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नको देवराया, अंत आता पाहू!

इमेज
"नको देवराया, अंत आता पाहू! प्राण हा  जावू पाहे" असा मराठीतील सुप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल भक्तीत भान हरवलेल्या माझा अंत तू आता बघू नकोस, लवकरच माझ्यासाठी धाव घे , अशी आर्त विनवणी या अभंगातून संत कान्होपात्रांनी विठ्ठलास केली आहे. सध्या हाच अभंग वेगळ्या संदर्भात म्हटला जावू शकतो. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत नको देवराया, अंत आता पाहु,प्राण हा तळमळला जाहू पाहे, असे म्हंटले जावू शकते.      कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात बेड मिळत नाही.जर बेड  मिळाला तर  आँक्सिजन किंवा व्हेंटीलिटर मिळत नाही. जर दोन्ही गोष्टी मिळाल्या तर, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या अपघातासारखा दुर्देवी प्रसंग ओढवून प्राण जाण्याचे भय आहेच. मी नाशिकच्या रुग्णालय दुर्घटनेत  प्राणास मुकलेल्या जीवांप्रती संवेदना प्रगट करतो. इश्वर मृत्यम्यांच्या आतेष्ठांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना     माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती डोळ्यावरील उपचारासाठी दवाखन्यात दाखल झाली होती. ती व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्यावर त्यास कोरोना झाला. अर्थात ती व्यक्ती तरुण असल्याने यातून पुर्णतः बरी झाली.