पोस्ट्स

सप्टेंबर २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 9)

इमेज
                             भारतीय क्रीडाविश्व बुद्धिबळ ऑल्मियाडमधील  उपांत्य फेरीतील (सेमी फायनल ) पराभवाचे दुःख विसरून पुन्हा एकदा एका नव्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ही स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने खेळवली जाणार असून स्पर्धा स्पेनमधील एका निसर्गाची लयलूट असणाऱ्या शहरात अर्थात स्ट्रिंग्स शहरात 26 सप्टेंबर ते 2  ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे . ही स्पर्धा आहे वूमन चेस टीम चॅम्पियनशिप 2021  26 सप्टेंबर रोजी स्पर्धक खेळ आयोजित केलेल्या शहरात येणार असून प्रत्यक्ष खेळाला 27 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे ही स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.   आणि 3ऑक्टोबर रोजी   स्पर्धक मूळगावी जातील या स्पर्धेमध्ये जगातील सर्वोत्तम अश्या 48 महिला बुद्धिबळपटू आपले कसब अजमावणार आहेत            बुद्धिबळ तसा वैयक्तिक खेळ मात्र ही स्पर्धा विविध संघांमध्ये होणार आहे . आशिया  ( ऑस्ट्रोलिया,   न्यझीलँड फिलिपाइन्स आदी देशांचा समावेश करून ) , आफ्रिका , अमेरिका ( उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा एकत्रित विचार करून ) आणि युरोप या चार खंडातून प्रत्येकी एक सर्वोत्तम संघ ,  बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अर्थात फिडेकडू