पोस्ट्स

सप्टेंबर १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोट्याच्या घटनेतून आपण काय शिकणार ?

इमेज
         कोटा आणि पुणे दोन्ही शहरे ही  स्पर्धा परीक्षा या क्षेत्राचा विचार करता अत्यंत महत्वाची समजली जातात. दोन्ही शहरामध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि देशभरातून येतात. लोकसेवा आयोगाची असो किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी  द्यावयाची प्रवेश परीक्षा असो,  ती स्पर्धा परीक्षा असल्याने त्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारखाच ताण असतो . त्यांच्या अडचणी सारख्याच असतात . त्यामुळे एका शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना ज्या अडचणी भेडसावतात,त्याच अडचणी दुसऱ्या शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जाणवणार हे सूर्य प्रकाश्याइतके स्पष्ट आहे. त्या सोडवण्याचा पद्धती देखील सारख्याच असणार.. मात्र एकाचवेळी दोन्ही शहरांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सारख्याच समस्या जाणवतील असे नाही. त्यामुळे या दोन्ही शहरांतील घडामोडी दुसऱ्या शहरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा ठरतात. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून कोटा शहरातून येणाऱ्या बातम्या बघितल्यास पुणे शहर कोणत्या मोठ्या ज्वा