पोस्ट्स

डिसेंबर २४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे

इमेज
               भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो, स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892रोजी केले होते . या 2019 ला या घटनेला 127वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य  कोणत्या दिशेने   नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली .  या ध्यानाच्या आधी त्यांनी समस्त  भारतातील परिस्थितीचे अवलोकन केले होते , या पारिजावर्क अवस्थेतील खेत्रीच्या  महारा

द्वितीय दशकपुर्ती विमान अपहरणाची

इमेज
        प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून वीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते .               काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे तो आहे विमानाच्या मूळ मार्ग तर लाल रेषेत दाखवलेल्या मार्गावरून विमान पप्रत्यक्षात