पोस्ट्स

नोव्हेंबर १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यांच्या स्थापना दिवसांच्या निमित्याने

इमेज
वर्षातील काही दिवस हे मोठे विलक्षण असतात.  त्या दिवशी अनेक घडामोड घडल्या असल्याने त्या दिवाशांना विलक्षण महत्व आलेले असते . आपल्या भारताचा विचार केला असता १ नोव्हेंबर हा त्या दिवसांपैकीच एक . आपल्या भारतात असणाऱ्या २८ राज्य आणि ८ केंद्रशासित प्रदेशांपैकी ९ राज्य आणि ५ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिवस हा १ नोव्हेंबर असतो . , तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्रप्रदेश छत्तीसगढ, मध्यप्रदेश ,राजस्थान, पंजाब आणि हरीयाणा  ही ती 9 राज्ये तर पड्डुचेरी (जूने नाव पाँडेचरी),अंदमान निकोबार , लक्षद्वीप, दिल्ली तसेच चंडीगढ या केंद्रशासित प्रदेशाचा स्थापना दिवस एकच १नोव्हेंबर असतो.          आपल्या भारतात प्रशासनाच्या सोयीनुसार राज्याची निर्मिती किंवा विलय केला जातो. आपले संविधान संघराज्य पद्धतीचे मात्र केंद्रीय सत्ता कहीसी प्रबळ करणारे आहे. अमेरीका या देशात विविध राज्यांनी स्व हितासाठी एकत्र येत संघराज्य स्थापन केले आणि अमेरीका हा देश तयार झाला. आपल्या भारतात तसे झाले नाही. पहिले देश तयार झाला मग त्याचे विविध राज्यात विभाजन करण्यात आले. आजमितीस भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.  ब्रिटीश