जरा याद करो उनको, जो लोटके घर ना आये
आपल्या भारताच्या इतिहासाकडे एक नजर टाकली असता स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक भळभळत्या जखमा झालेल्या आपणस सहज दिसतात . आजपासून 11 वर्षपूर्वी झालेली मुंबईवरील दहशतवादी हल्याची जखम त्यापैकीच एक . पाकपुरस्कृत दहशवादी संघटना लष्करे ए तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईत 6 ठिकाणी सलग 4 दिवस दहशतवाद्यांनी हल्ला केला .यामध्ये अजमल कसाब या एका दशवाद्याला आपल्या शूर सुरक्षा दलांनी पकडले . बाकीचे दहशतवादी या हल्यात मारले गेले . यामध्ये निष्पाप 165 मृत्युमुखी पडले , ज्यात भारतीयांसह अन्य देशांचे नागरिक देखील होते . तर 302 जायबंदी झाले . आज 2019 साली या हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण होताना या हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीरांना आणि निष्पाप नागरिकांना माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली मुंबईवर 1993साली झालेल्या साखळी बाम्बस्फोटानंतर झालेल्या अनेक द...