पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रत्येक खेळाडूने वाचायलाच हवे असे पुस्तक, "विजयाचे मानसशास्त्र*

इमेज
      सध्या आपल्याकडे खेळाला करीयर म्हणून स्वीकारणारे अनेक जण दिसतात. या खेळाडूंना त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी  होण्यामागे मानसशास्त्र हे खूप महत्तवाची भुमिका बजावते. मानसशास्त्रातील अनेक बाबी खेळताना वापरल्याने त्यांचा खेळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावतो ,ज्याचे परिणामस्वरूप म्हणून या बाबींचा अभ्यास असणारे हे खेळाडू अनेक स्पर्धा सहज खिश्यात घालतात. खेळणे हेच त्यांचे करीयर असल्याने अंतिमतः या यशाचा फायदा त्यांचे खेळातील करीयर यशस्वी होण्यात होतो. मात्र अनेकदा खेळाडूंना सोडा, त्यांचा प्रशिक्षकांना देखील या बाबी माहिती नसतात, किंवा माहिती  असल्यास देखील या बाबी फक्त  वरिष्ठ स्तरावरील खेळाडुंनाच उपयोगी  पडतात. प्राथमिक स्तरावरील खेळाडूंना  या बाबी अनावश्यक  आहे  असा त्यांचा गैरसमज असतो परीणामी खेळाडू त्यांचा सर्वोत्तम  खेळ करु शकत नाहीत. खेळाडूंचे असे नुकसान होवू नये ,म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि नोकरीच्या सुरवातीच्या काळात उत्कृष्ट  पद्धतीने  नेमबाज हा क्रीडा प्रकार खेळणारे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कै. भिष्मराज बाम सरांनी लिहलेले "विजयाचे मानसशास्त्र" हे पुस्तक प्रत्येक खेळा