पोस्ट्स

शिक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तुम्ही शिकवाल हो‌ हिंदी !

इमेज
                                  नुकताच आपल्या राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून हिंदी हि भाषा एक विषय शिकवण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचा, निर्णय घेतल्याचे एव्हाना तुम्हाला आता माहिती झाले असेलच. . या विषयावर आता वेगवेगळ्या अंगाने चर्चा सुरु आहे ज्यात उत्तरेतील राज्ये त्रिभाषा सूत्र स्वीकारतात का ?  भाषावार प्रांत  रचनेचा मूळ हेतू काय  ? हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा आहे का ?  ऊत्तर भारतीयांच्यी सोइ करण्यासाठी ही खेळी आहे . दक्षिणेकडील राज्यात अशा निर्णय घेऊन दाखवा , अश्या विविध उपविषयांच्या आधारे करण्यात येणारे दावे प्रतिदावे आरोप प्रतिआरोप करण्यात येत आहेत .मात्र या सर्व गदारोळात एका महत्वाच्या मुद्द्यावर मात्र फारच कमी बोलले जात आहे . किमान माझे तरी तसे निरीक्षण आहे तो म्हणजे ज्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याबाबत हे सर्व आकांडतांडव सुरु आहे त्यांच्या भावविश्वाचा !                               ...

दर 44 मिनीटांनी एक!

इमेज
        दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते.      काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि...

दक्षिण कोरियाचा घटनेतून आपण काय बोध घेणार ?

इमेज
           गेल्या बुधवारी अर्थात २० सप्टेंबर रोजी दक्षिण कोरिया या देशाच्या संसदेने एक शिक्षण विषयक कायदा केला . जो  कायदा आपल्या भारताला देखील खूप काही शिकवून जाणारा आहे  शिक्षणाचा सर्वगाडा ज्या शिक्षकांवर असतो त्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या संबंधावर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा कायदा आहे .एका २३ वर्षीय शिक्षकाने पालकांनी केलेल्या तक्रारीवरून त्रासून जाऊन आत्महत्या केल्याची काळी किनार या कायद्यास आहे. या कायद्यान्वये शिक्षकांना पालकांनी तक्रार केल्यावर लगेचच कामावरून कमी करण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे तसेच त्यांना कायदेशीर मदत पुरवणे , तसेच त्यासाठी योग्य  प्रमाणात आर्थिक मोबदला देणे या जवाबदाऱ्या मुख्याध्यापकांवर  सोपवण्यात आल्या आहेत  तसेच शिकवताना अडथळा आणणाऱ्या विद्यार्थ्यास माफक प्रमाणात शिक्षा करणे आधी अधिकार मिळणार आहेत .या प्रकारच्या कायदा करण्यात यावा या साठी दक्षिण कोरियातील शिक्षकांनी देशभर आंदोलन केले होते    (दक्षिण कोरिया हा टीचभर क्षेत्रफळाचा देश आहे )  ज्याच्या परिणामस्वरूप हा कायदा करण्यात ...

सोपी वाक्ये वाचता येणे ,साधे अंकगणित झाले कठीण

इमेज
         सोपी वाक्ये वाचता येणे , साधे अंकगणित झाले कठीण , शिर्षक बघून चमकलात ना ! हे कसले शिर्षक, असा प्रश्न आपणास पडला असेल तर सांगतो. देशाची शैक्षणीक सद्यस्थिती स्पष्ट करणाऱ्या, प्रथम या स्वंयस्वेवी संस्थेच्या असर या अहवालात 2022सालची जी स्थिती सांगण्यात आली आहे. तीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असेच करावे लागेल.या अहवालानुसार देशातील पाचवीतील २८. २ क्के विद्यार्थाना साधी दोन अंकी वजाबाकी करता येत नाही तर  २७. ३  टटक्के विद्यर्थाना दुसरीत शिकवले जाणारा मजकूर देखील वाचता येत नाही गेल्या अहवालापेक्षा  (सन २०१८ ) हे प्रमाण वाढलेले आहे त्यावेळी २०. ५ टक्के  मुलांना वाचता आणि २५. ९ टक्के विद्यर्थाना साधे अंक गणित करणे जमत नव्हे कोव्हीड १९ च्या साथरोगामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे हे प्रमाण काहीसे घसरले असे सामील तरी हि घसरण चिंताजनक आहे . बुधवार १८ जानेवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यासाठी देशातील ६१६ जिल्ह्यतील १ ९ हजार  गावातील ७ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे देशातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विदय...

अवसान घातकी निर्णय !

इमेज
शुक्रवार दिनांक 12 मार्च रोजी देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या AICTC ने  अभियांत्रीकी बाबत एक निर्णय जाहिर केला. तो म्हणजे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. होय . आतापर्यंत सक्तीचे असणाऱ्या या विषयांना  आता ऐच्छिक विषयांचा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे  या ऐच्छिक विषयाचा सूचित 14 विषयांचा  समावेश करण्यात आला आहे . या ऐच्छिक विषयांचा सूचीतील कोणतेही तीन विषयात सर्वसाधारण गटात 45% आणि राखीव गटात 40% गन मिळवूंन उत्तीर्ण झाल्यास आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार असल्याचे नव्या धोरणात सांगण्यात आले आहे . आंतरशाखीय शिक्षणाचा पाय म्हणून वाणिज्य शाखेतील व्यक्तींना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून हा बदल करण्यात येत असल्याचे याबाबत बोलले जात आहे .  अ_व_सा_न_घा_त_की निर्णय म्हणूनच या निर्णयाकडे बघावे लागेल  अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया म्हणून ज्या विषयांकडे  बघण्यात येते .तेच विषय जर ऐच्छिक केल्यामुळे जर हे विषय ना घेता अभियांत्रिकी शिक्ष...

ऑनलाईन शिक्षणाच्या कथा

इमेज
               सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी शिक्षण कोणत्या प्रकारे सुरु करता येईल ,  बाबाबत विविध  मतमतांतरे सध्या समाजमाध्यमांद्वारे मांडली  जात आहेत   काही व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे अशी मागणी करत आहेत . तर काही जण  ऑनलाईन शिक्षण मुलांना देणे  धोक्याचे आहे , त्याच प्रमाणे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी संसाधने सांगण्याकडे आहेत का ? असा मुद्दा मांडता त्यास विरोध करत आहे .मात्र या संदर्भात मी आतापर्यत विविध   प्रसारमाध्यमांकडून  ऐकलेल्या/ वाचलेल्या  चर्चेत एक मुद्दा काहीसा दुर्लक्षिला जात आहे असे  मला वाटतं  असल्याने तो मुदा मांडण्यासाठी आजचे लेखन .                                         तर पुण्यातील प्रभात रोड येथे पूर्वी कार्यरत  असणाऱ्या  आणि सध्या बंद पडलेल्या बालचित्रवाणी या संस्थेने ही संस्था कार्यरत असताना विद्यार्थ्...

नावात काय आहे ?

इमेज
       नावात काय आहे ,असे सुप्ररसिद्ध इंग्ररजी साहित्ययीक शेक्सपियर यांचे विधान आहे. मात्र सदर विधान करतांना शेक्सपियर यांनी सन 2020मध्ये भारतात येणाऱ्या शिक्षणतज्ञांचा विचार बहुधा केला नसावा,कारण त्यांनी जर असा विचार केला असता , तर खचितच त्यांनी असे विधान केले असते. कारण सन 2020 मधील भारतातील शिक्षणतज्ञांनी शेक्सपियरला खोटे पाडणारे संशोधन केले आहे .नापास या शद्बामुळे विद्यार्थ्यांचा मनात भिती बसते , सब   नावात काय आहे? असे इंग्रजीतील सुप्रसिद्ध साहित्यीकब त्यांना नापास न म्हणता कँपिसिटिबल म्हणावे, असा आदेश.सिबिएससी च्या शिक्षणतज्ञांनी काढला आहे . मात्र मुळात अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थी अभ्यासात भक्कम बनतील याबाबत कोणती कार्यवाही करण्यात यावी, याबाबत त्यांनी सोईस्कर मौन धारण केले आहे . अभ्यासात एखादा विषय कमकुवत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे न शिकवता अन्य कोणती पद्धत वापरता येवू शकते ?याबाबत त्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे .त्यांना काही अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास मनाई करुन एक प्रकारे त्यांना विषमतेचीच वागणूक दिली आहे .त्यामुळे सर्वस...

स्पर्धा परीक्षेतील घोटाळा माध्यमात आलेला ( भाग 2)

इमेज
              सध्या आपल्या भारतात पारंपरिक माध्यमे नववर्षाच्या बातम्या देण्यात मग्न असताना,   मात्र राजस्थानातील हजारो युवक युवतींचा जीव टांगणीला लागलाय, आणि याला कारणीभूत ठरलाय,  तो राजस्थान लोकसेवा आयोगाच्या निष्काळजीपणा  . ज्या परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत मे 2018ला संपते . त्या परीक्षेचा पहिला टप्पा पार पडतो तो तब्ब्ल दीड वर्षाने अर्थात 30 डिसेंबर 2019ला . बर पहिला टप्पा तरी शांततेत पार पडतो का ? याचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते . परीक्षा सुरु होण्याच्या दोन तास त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका फुटते . परिणामी ती परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की राजस्थान लोकसेवा आयोगावर येते .परीक्षा नंतर घेण्यात येईल असे मोघम उत्तर प्रशासनकडून देण्यात येते . मात्र पुनर्परीक्षेचा दिनांक जाहीर करण्यात येत नाही .काय म्हणावे यास ? मागे 'गुजरात लोकसेवा आयोगाच्या' "बिन सचिवालय" या परीक्षेत सुद्धा अशाच प्रकार  घडला होता . (त्यावेळी  लिहलेल्ल्या ब्लॉगची लिंक या ब्लॉग पोस्टच्या शेवटी देण्यात आली आहे . ) मात्र  प...

भाषा प्रेम खरे आणि बेगडी

इमेज
                                                       सध्या मराठी वृत्तवाहिन्या महाराष्ट्राच्या होणाऱ्या  मुख्यमंत्र्यांबाबबत इत्यंभूत माहिती देत असताना,  भारताच्या उत्तर बाजूला असणाऱ्या एका राज्यातील एका मानांकित विद्यापीठात मात्र वेगळेच नाट्य रंगतंय . आम्हला  एक भाषा  विषय शिकवायला अमुक एक प्राध्यापक  नको , या कारणासाठी विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे . सदर प्राध्यापक विषयातील तज्ज्ञ आहेत, त्यांच्यावर कोणत्याही भिन्नलिंगी व्यक्तीवर  कोणत्याही प्रकारचा अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलेला नाही . ते विद्यार्थ्यांना  समजेल अश्या पध्द्तीने शिकवतात . मात्र तरीही हे प्राध्यापक  या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना  नकोय . या विद्यार्थ्यांना  यासाठी फार मोठे आंदोलन करायला सुरवात केली आहे .विद्यार्थ्यांचे आंदोलन का  होत आहे ? याचा  मागोवा घेतल्यास मन निराश करणारी परिस्थिती सम...

कला शाखेचा अंत ?

इमेज
  सध्या भारतासमोरचा सर्वात मोठा यक्षप्रश्न म्हणून बेरोजगारीकडे   समाजशास्त्रज्ञ   बघत आहेत . त्यावर सरकारही नवे उद्योग उभारण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे . मात्र या कारखन्यांमध्ये काम कोण करणार ? सर्व जण त्या कारखन्यात काम करु शकतील का ? याकडे कोणीही लक्ष देत नाहीये . मला तूम्हाला लक्ष वेधून घायचे आहे ते त्याकडे .  ज्यांना यांत्रिकीची जाण आहे   अश्या  व्यक्ती कारखान्यात कामगार म्हणून काम करतील . ज्यांना हिशेबाचे ज्ञान आहे अश्या व्यक्ती वाणिज्य शाखेतील कामकाज सांभाळतील मात्र प्रश्न उरतो तो कला शाखेतील विद्यार्थ्यांचा . त्यांच्याकडे यापैकी   कोणतेच कौशल्य नसणार . मग अशा बेरोजगार     तरुणाईने काय करायचे ? सध्या कोणीच त्यांच्या   प्रश्नाकडे    बघत नाहीये . माझ्या माहितीप्रमाणे अश्या कात्रीत सापडलेल्या तरुणाईची संख्या प्रचंड आहे .                  नाही म्हणायला " मानसशास्त्र " सारख्या ...

व्यथा त्यांचा

इमेज
                            सध्या शिक्षणात खूप सारे बदल होत आहे मात्र या सर्व प्रयानात एक घटक काहीसा दुरावलेला दिसतो तो म्हणजे शिक्षण अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुला मुलींचा .नाही म्हणायला यातील काही घटकांची गेल्या काही दिवसात बरीच चर्चा झालेली आहे जसे स्वमंगता (ऑटिझम ),वगैरे मात्र या समस्या १८ पेक्षा जास्त असून त्यातील फारच थोड्या यात चर्चील्या गेल्या आहे    शाररीक कारणामुळे येणारी अध्यय अक्षमता जसे मूक बधीरपणा,    अस्थिव्यंग या मुळे होणारी अक्षमता समाजाचा लगेच लक्षात येते मात्र मानसिक अनारोग्यामुळे येणारी अक्षमता ज्याचा वाटेला येते त्याचां वाटेला फारच त्रास येतो ते काम टाळण्यासाठी हे नाटके करत आहेत असे त्याचाविषयी बोलले जाते शाररीक व्यंग ज्या प्रमाणे सहज दिसते त्या प्रमाने मानसिक व्यग दिसत नसल्याने व समाजात त्याविषयी फारच अज्ञान असल्याने त्याची फारच परवड होते त्याचे प्रकार पुढील प्रमाणे व थोडक्यात माहिती                 1 ) विशिष्ट वाचा दोष -भाष...

चला जाणून घेउया शाळांच्या विविविधतेविषयी

इमेज
                                     सध्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणातील कळीचा मुद्दा कोणता असेल ? तर   तो आहे विविध माध्यमातील शाळा . जसे सीबीएससीच्या शाळा आयसिएससीच्या शाळा आणि राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभयास क्रम राबवणाऱ्या शाळा . गुणांकन पध्द्त आणि भाषा विषयावरून या विविध प्रकारच्या शाळा चर्चेत आहेत . तर जाणून घेउया या शाळांच्या प्रश्नविषयी                                                            भारतात प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शैक्षणिक बोर्ड आहे त्यांतर्गत त्यातील शाळांचा कारभार चालतो त्या त् या या राज्याचा संस्कृतीनुसार तेथील अभ्यासक्रम असतो भारतामध्ये विविधता असल्याने प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम वेगळा असतो याचा फटका ज्यांची वि...

शिक्षणातील महत्वाचा दुवा शिक्षक

इमेज
           शिक्षणात अत्यंत महत्वाचा घटक असणारा शिक्षकाविषयी फारच कमी बोलले जाते आज याविषयी बोलणार आहे  आपल्या  भारतात शिक्षकांना कागदोपत्री अत्यंत मानाचे स्थान  आहे . त्यांना राष्टपती पुरस्कार देण्यात येतो . भारतीय संस्कृतीत त्यांचाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका सणाची तरतूद करण्यात आली आहे . मात्र विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी प्रत्यक्ष जोडले गेलेल्या शिक्षकांचाविषयी फार कमी बोलले जाते . विद्यार्थ्यांचा आनंदमय शिक्षणात त्यांचा देखील महत्वाचा  सहभाग असतो . मात्र आपल्याकडून त्यांचा समस्या जाणून घेउया .               चांगल्या शिक्षणासाठी त्याना अशैक्षणिक कामे देऊ  नये असे बोलले जाते मात्र सध्याचा शिक्षणाच्या विविध प्रयोगाच्या काळात त्यांना प्रचंड प्रमाणात शैक्षणिक कामे करावे लागतात उदा प्रत्येक आठवड्यात चाचणी घेणे ते PAPER तापासणे त्यांना मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रुपांतर करणे त्या श्रेण्य्या प्रगती पुस्तकात भरणे  इत्यादी अनेक कामे त्यांना शैक्षणिक म्हणून करावी लागतात . त्याच प्रमा...

हेतू योग्य , कृती अयोग्य

इमेज
                      सध्या महाराष्ट्रातील शैक्षणिक वातावरण विविध वादांनी गाजतंय , ज्यात इयत्ता दुसरीच्या अभ्यासक्रमाचा विषय प्रमुख आहे . अभ्यासक्रमात गणित विषयातील क्लिष्टता दुर व्हावी या उद्देशाने संख्या शिकवण्याची पद्धत याचा मुळाशी आहे . या बाबत एका वाक्यात सांगायचे झाल्यास , हेतू चांगला प्रामाणिक आहे, त्याबद्दल शंका घेण्यास वावच नाहीत, मात्र हे राबवण्याची पद्धत पुर्णतः.अयोग्य आहे                  शिक्षणाद्वारे  कमकुवत व्यक्तींचा क्षमता वाढवणे अपेक्षीत असताना, अस्तिवात असलेल्या क्षमतेला अनुसरुन अभ्यासक्रम राबवल्यास क्षमता अजून खालावेल मग त्या वेळेस दर्जा अजून खालवणार का ? हा प्रश्न आहे . क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय यावर आहे.                   आणि अश्या पध्द्तीने शिकलेले लोक आयष्यातील अडीअडचणींना तोंड देण्यास सक्षम होतील का ? मी एका ठिकाणी व्याख्यान ऐकलेले होते , त्यात त्यांनी सांगितले होते . आयुष्यातील अडचणींना घाबरायचे...

खैरात संपली गुणवत्ता घटली

इमेज
                                 आज लागलेल्या शालान्त परीक्षेच्या  निकालाचे  वैशिष्ट्य म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात येणारी गुणांची खैरात या वर्षी कमी देण्यात आली  . परिणामी  यावर्षी गेल्या  बारा वर्षातील उत्तीर्णांच्या निच्चांकांची नोंद  करण्यात आली . जे एका अर्थाने योग्यच झाले . गुणवत्तेच्या सुजवटीला त्यामुळे काही प्रमाणात . आळा बसला . अन्यथा ही सुजवटी जर काही काळ  अशीच सुरु राहिली   तर भविष्यात या गोष्टीचे अनेक अनिष्ट परिणाम दिसून आले असते  .       गुणवत्ता यादी बंद करून देखील दहावीच्या परीक्षेला आलेले अवास्तव मह्त्व आणि त्यातून येणाऱ्या ताणाला विद्यार्थाना सामोरे जाण्यासाठी काहीशी सोपी केलेली परीक्षा  पद्धती यामुळे  गेल्या काही वर्ष[पासून अनेक उत्तीर्णांची संख्या फुगलेली दिसत होती . एकीकडे "स्वयंम", " प्रथम सारख्या समाजसेवी संघटनांचे शालेय गुणवत्तेबाबत झोप उडवणारे अहव...