पोस्ट्स

जानेवारी १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गेली ती नाशिक पुणे रस्त्यातील रंजकता

इमेज
   आजचीच गोष्ट आहे. सहजच व्हाँटसपवर बघत असताना एका व्हाँटसप ग्रुपवर एक पोस्ट दिसली.पोस्टमध्ये मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर झालेले बदल आणि त्यामुळे प्रवाश्यातील मज्जा कशी संपली, हे सांगितले होते. पोस्ट वाचल्यावर मी सातत्याने प्रवास करत असलेल्या नाशिक पुणे रस्त्यातील गेल्या काही वर्षापासुन  झालेले बदल डोळ्यासमोरुन झरझर जावू लागले. ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .       नाशिक पुणे रस्त्यातील चंदनापरी घाटाची मज्जा  काही औरच असायची. तेथील वेडीवाकडी वळणे,  गणपतीची मुर्ती याची गंम्मतच काही और होती.  नाशिककडून येताना घाटातील अवघड टप्पा चांगल्या पद्धतीने पार पडल्याबद्दल आभार मानायला आणि पुण्याकडून येताना हा टप्पा चांगला  पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी अनेकांचे हात सहजतेने जोडले  जात असे .मी गमतीने मनोमनी  घाटात घाट चंदनापुरी असे माझ्या मित्रांना म्हणत असे.चंदनापुरी घाटातून पुण्याकडे जाताना दिसणारे नेढे(डोंगराला पडलेले  भोक ज्यातून आरपार जाता येईल असे मोठे छिद्र ). तर पुण्याकडून नाशिकला येताना  अवघड वळणानंतर डाव्या बाजूला दिसणारी इंग्रजी  व्ही आकाराची चढण, तर यापुर्वी या परीसरात

आत्महत्या एक दुर्लक्षीत जीवघेणी समस्या

इमेज
                 सध्या कोणतीही वर्तमानपत्रे चाळली असता त्यामध्ये आत्महत्येचा बातम्या दिसतातच . एखादे वर्तमानपत्र जर रोज डोळ्याखालून घातले तरी त्या वर्तमानपत्रात आलेल्या दिसतात . आणि या आत्महत्या करणाऱ्या लोकांचा वयोगट जर बघितला तर त्याचा वयोगट प्रामुख्याने  तिशीच्या आतबाहेर असल्याचे आपणास सहजतेने दिसते . खरेतर हे वय काही करून दाखवण्याचे मात्र या वयात हि माणसे आपली जीवनयात्रा संपवतात . मात्र एखाद्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रचंड खाल करणारी आपली पारंपरिक माध्यमे ज्या प्रमाणात  प्रकाश टाकायला हवा  त्या प्रमाणात प्रकाश टाकत नाहीत . असे माझे निरीक्षण आहे .(माझे निरीक्षण परिपूर्ण आहे अशा माझा मुळीच दावा नाहीये ) त्यामुळे या नवमाध्यमाद्वारे त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन             तर मित्रानो अकबर आणि बिरबलाची माकडिणीचीगोष्ट आपल्याला माहिती असेलच एकदा बिरबल अकबर फिरायला गेल्यावरत्यांना  एका मोकळ्या हौदात एक माकडीण आपल्या पिल्लासोबबत खेळताना दिसते,   हे  बघून अकबर बिरबलास म्हणतो बघ त्या माकडणीचे आपल्या पिल्लवर किती प्रेम आहे . बिरबल अकबरला  थांबवून त्या हौदात पाणी सोडायला सांगतो .त